अगा माझ्या जनार्धना अगा माझ्या जनार्दना । काय उपेक्षिसी दीना ? ॥धृ.॥ काय तुज भीक आली । आमुच्याने पूर्ण झाली ? ॥१॥ तू तो सकळांचा दाता । अधिकार कां पाहता ? ॥२॥ तुकड्या म्हणे कृपा करा । नोहे माझ्याने उतारा ॥३॥