वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी
🔥 सुचना क्र. १ : या संकेतस्थळावर वं. राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांचे समग्र साहित्य (गद्य - पद्य) अपलोड करणे सुरू आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत आपणास काही साहित्य अपूर्ण / अव्यवस्थित दिसेल. त्याकरिता दिलगिरी व्यक्त करत आहोत. हे काम पूर्ण झाल्यानंतर आपणास तशी माहिती देण्यात येईल. जय गुरु ! 🙏 🔥 सुचना क्र. २ : कुठलेही भजन किंवा गद्य - पद्य साहित्य शोधण्यासाठी शक्यतोवर त्यात असलेल्या साध्या शब्दांची निवड करावी, जसे की 'मंगलमय नाम' / 'चरण तयांचे'. जोडशब्द, वेलांटी, उकार असलेले शब्द संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या शब्दाप्रमाणे असावेत अन्यथा आपल्याला हवे असलेले साहित्य दिसणार नाही. धन्यवाद !

सामुदायिक ध्यान


(प्रातर्विधी व स्नानानंतर सूर्योदयापूर्वी निवांतजागी ध्यानाचा कार्यक्रम सुरु करणे आवश्यक आहे. वातावरण निर्मितीसाठी प्रारंभी ध्यानपर दोन भजने एका सेवकाने म्हणावी, इतर उपासक शांत बसतील.)

- प्रारंभिक भजने -

१. ( तर्ज - मेरा गीत अमर कर दो... )

गुरुदेव ! दया कर दे, हम ध्यान धरें तेरा ।
दासों को यही वर दे, हम ध्यान धरें तेरा ॥टेक॥

उस ब्रम्ह मुहूरतपर, वह नींद त्यजी हमने ।
निपटाकर सब बातें, फिर स्नान किया हमने ।
इस कारण चल आयें, हम ध्यान धरें तेरा ॥१॥

इस निर्मल आसन पे, कुछ फूल झुकाये है ।
तन-मन से किया वंदन, बडे भागसे पाये है ।
मन मस्त भया अब तो, हम ध्यान धरें तेरा ॥२॥

गंभीर प्रशान्तीमें, यह जलता है दिया ।
कहे तुकड्या आसन पे निज-प्रकाश मै पाया ।
वह ज्योत जले हरदम, हम ध्यान धरें तेरा ॥३॥

२. ( चाल - बहुत प्यार करते है तुमको सनम... )

तुझे ध्यान हे अंती येईल कामी ।
म्हणोनि प्रभू ! शरण आलो तुला मी ॥धृ.॥

महाकाळ विक्राळ बाधू शकेना ।
तुझ्या चिंतनी विघ्न टाळताती नाना ।
सदा सौख्य, आनंद पावेल प्रेमी ॥१॥

अहिल्या शिळा स्पर्शता मुक्त झाली ।
महाकीर्ती ही व्यापिली कर्णी आली ।
किती भक्त हे तारिले रामनामी ॥२॥

अती संकटे व्यापिती मोहजाळे ।
सदा जीव कामादि दुःखात लोळे ।
म्हणे दास तुकड्या सदा हो तुझा मी ॥३॥

- सामुहिक संकल्पगीत -

आओ सभी मिल जायके, प्रभु-ध्यान धरेंगे ।
‘सबका भला करो', यही आवाज करेंगे ॥टेक॥

बैठेंगे एक लैन लगाकर के सामने ।
अपने बनाये भाव को, रखकर के सामने ।
हम सरको झुकायेंगे, अभिमान हरेंगे ॥१॥

गायेंगे वही गाना, सेवक पुकारते ।
लायेंगे अमल में सदाही दिल सुधारते ।
निर्भय बनेंगे, ना कभी कालोंसे डरेंगे ॥२॥

आती रहें हवा भली, दुनियामें जोरकी ।
छोडेंगे नहीं कामना, प्यारे किशोर की ।
‘तुकड्या’ कहे गुरुदेव से भावधार तरेंगे ॥३॥

- प्रात:स्मरण-श्लोक -

प्रात:स्मरामि हृदि संस्फुरदात्मतत्वम् ।
सच्चित्सुखग् परमहंसगतिन् तुरीयम् ॥
यत् स्वप्नजागरसुशुप्तमवैति नित्यम् ।
तद् ब्रम्ह निष्कलमहम् न च भूतसंघः ॥

अर्थ - माझ्या हृदयामध्ये स्फुरण पावणाऱ्या सत्-चित्-आनंद (सुख) म्हणजे परब्रम्ह स्वरूप असलेल्या आत्मस्वरूपाचे मी प्रात:काळी स्मरण करतो. (कारण) जे (ब्रम्ह) जागृती, स्वप्न व सुषुप्ती (निद्रा) या अवस्थांमध्ये नित्य जाणवते व ब्राहय जगतामध्येही असते, तेच शुद्ध ब्रम्ह मी आहे. मी म्हणजे (केवळ ) पंच महाभूतांचा समुदाय असलेले हे शरीर नव्हे.

प्रातर्भजामि मनसो वचसामगम्यम् ।
वाचो विभान्ति निखिला यदनुग्रहेन ।
यन्नेति-नेति वचनैर्निगमा अवोचु ।
स्तन् देवदेवमजमच्यु तमाहुरग्ग्रम् ।

अर्थ - मन वाणीला अगोचर असे जे ब्रम्हतत्व आहे, ज्याच्या कृपेने (परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी या चारही वाणी शोभतात आणि वेदांनी ज्याला ‘नेति-नेति’ या शब्दांनी 'हे नव्हे, हे नव्हे' वर्णीले आहे, ज्याला आज (जन्मरहित) व अच्युत (न ढळणारा) तसेच अगम्य (जाणण्यास कठीण) असे म्हटले जाते, त्या देवाच्याही देवाचे मी प्रात:काळी मी भजन करतो. (भजतो)

प्रातर्नमामि तमसः परमर्क वर्णम् ।
पूर्णम् सनातनपदम् पुरुषोत्तमाख्यम् ।
यस्मिन्निदन् जगदशेषमशेषमुर्ती ।
रज्ज्वाम् भुजंगम् इव प्रतिभासितम् वै ।

अर्थ - (अज्ञानरूपी) अंधाराच्या पलीकडील (ज्ञानस्वरुप ) सूर्याप्रमाणे तेजस्वी असलेल्या पूर्णस्वरूप, अनादि व ज्याच्या ठिकाणी हे संपूर्ण जग भासमान होते, जसा दोरीवर भुजंगाचा भास होतो पण ते आत्मतत्व अलिप्त असते, अशा त्या सनातन पुरुषोत्तमाला मी प्रात:काळी नमस्कार करतो.

- ध्यानाचा पाठ -

“हे गुरुदेव हम सबको सतबुद्धी दे । सतकर्तव्य करने की प्रवृत्ती दे । सच बोलनेका अभ्यास दे । सतस्वरूप का ग्यान दे । हे जगद्व्यापी परमेश्वर ! हम हर मनुष्यमात्र से प्रेमका, सत्यताका, बंधुत्वभावका आचरण करें और सुख-दुःखमें सम रहे, ऐसी हमको शक्ति दे, युक्ति दे और भक्ति दे ।

हे सर्व धर्म में, सर्व संत में, समस्त संसारमें, रममाण होनेवाले चैतन्यघन ! हम तेरे लिये, तेरे देशके लिये, हर जीवजंतुके लिये, कुटिलताका, अनैतिकताका, छलछिद्र-द्रोहताका त्याग करें, ऐसा साहस दे । हे भगवन् ! अंतमे तुझमे समरस हो जायें, यह हमारा ध्येय है, उद्देश है। इसके लिये तुझको स्मरके निश्चय करते हैं, प्रतिज्ञा करते हैं ।

हे विश्वधर्म को नियमन करनेवाले परमात्मा ! जहाँ भी, जिधर भी, हममें कुछ कमी दिखती हों, उसमें हमारा ध्यान लगाकर उस चीज को, उस कार्य को पुरा करने में हम अपना स्वराज्य समझते हैं, सुराज्य समझते हैं । यह समझने की और कर्तव्य करनेकी हमको प्रय दे, शक्ति दे, वरदान दे, शक्ति दे, वरदान दे ।

- नामधून -

१. नारायण नारायण जय गोविंद हरे ।
    नारायण नारायण जय गोपाल हरे ॥

२. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी ।
    हे नाथ नारायण वासुदेव ॥

३. जय जय राम कृष्ण गोविंद नारायणा ॥

(यापैकी कोणतीही एक ‘नामधून’ सेवकाने म्हणावी.)

- ग्रंथारम्भ – स्तवन -
(भुजंग-प्रयात)

नमो सदगुरु ! ज्ञानदीप प्रकाशा !
नमो आद्यरुपा अनंता परेशा !

नमो मंगलामंगल द्वैत-हारी !
नमो त्वत्कृपा पूर्ण दोषा निवारी !

तुझे रूप ते पाहु दे विश्वव्यापी !
तुझी पाउले सेवु दे ग्रामरूपी !

तुझे ज्ञान सर्वांतरी संचरु दे !
तुझा सत्य आनंद लोकी भरु दे !

खरे नाम निष्काम ही ग्रामसेवा !
झटू सर्वभावे करू स्वर्ग गावा !

कळो हे, वळो देह कार्यी पडू दे !
घडू दे प्रभो ! एवढे हे घडू दे !

॥ सद्गुरुनाथ महाराज की जय ॥

(वरील स्तवनानंतर ग्रामगीतेतील एका पानावरील ओव्या वाचकाने स्वरात वाचाव्या. इतर उपासक लक्षपूर्वक ऐकतील.)

- आत्मचिंतन गीत -

(तर्ज - वैष्णव जन तो तेने कहिये ... )

अपने आतम के चिंतन में, हरदम जागृत रहना है ।
ओऽहं सोsहं स्वाससे अपनी अंतरदृष्टी निरखना है ॥टेक॥

चंचल मनको बुद्धि विचारक शुद्धि सततही करना है ।
निश्चल कर वृत्तीकी धारा अंतरमुखसे स्थिरना है ॥१॥

सहज समाधी चलते हलते सब कामोमें रखना है ।
विश्वरुप विश्वात्मक दृष्टी अनासक्तिसे चखना है ॥२॥

सुख-दुख दोनो जीवधर्म है इनसे निवृत होना है ।
सदा आत्म आनंद की मस्ती पलपलमें अनुभवना है ॥३॥

संत मिले सतसंग लाभकर ग्यान- ध्यान में रमना है ।
कर्मफलोंका त्याग निहितकर शांती स्थान में जमना है ॥४॥

इस मानव जीवन में इतनी मंजील चढकर जाना है ।
तुकड्यादास कहे यह बानी, रोज रोज अनुभवना है ॥५॥

भाषण असल्यास सुचना - (यानंतर सामुदायिक ध्यानाच्या महत्वावर माननीय श्री. हे दोन शब्द सांगतील अशी मी त्यांना विनंती करतो.)

भाषणानंतर सुचना - (यानंतर सर्वांनी सरळ बसुन एका स्वरात शांतीपाठाला करावी सुरुवात.)

- शांतीपाठ -

हरि ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते ।
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॥
ॐ शांति: ! शांति: !! शांति: !!!

॥ सद्गुरुनाथ महाराज की जय ॥

सूचना – (यानंतर सरळ बसून काहीवेळ आत्मचिंतनास करावी सुरुवात.)

सूचना – (यानंतर आपणास सामुदायिक नमस्कार करावयाचा आहे. त्याकरिता सर्वांनी बसावं गुडघ्यावर.. हात जोडून करावा नमस्कार.. सरळ व्हावं.. आदरपूर्वक उभं राहावं.)

यानंतर मी ‘श्रीगुरूदेव की' म्हणेन, आपण सर्वांनी गंभीरतेने मागाहून 'जय हो' म्हणावं.

- त्रिवार जयघोष -

श्रीगुरूदेव की, जय हो ।
श्रीगुरूदेव की, जय हो ।
बोलोजी श्रीगुरूदेव की, जय हो ॥

असल्यास – पुढील कार्यक्रमाची सूचना जयघोषानंतर द्यावी.

सूचना - आपला आजचा सामुदायिक प्रार्थनेचा कार्यक्रम समाप्त झाला आहे, जाण्याकरीता उजवीकडून वळावं पाठीमागे. शांततेने चालू लागावं.

- जय गुरु -