वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी इथे शब्द सादर करा

अंधारिया रात्री दिसते का तुम्हा

अंधारिया रात्री दिसते का तुम्हा ? ।
कल्पनेच्या भ्रमा फुका जाय ॥

कोणीही भेटला तरि काय जाणे ? ।
काळोखाचे जिणे अमंगळ ॥

पाहिजे प्रकाश ओळखाया तरी ।
येर काय करी आपुल्याने ? ॥

तुकड्यादास म्हणे ज्ञान-दिवा लावा ।
तुमचिया गावा हरी राहे ॥