वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी
🔥 सुचना क्र. १ : या संकेतस्थळावर वं. राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांचे समग्र साहित्य (गद्य - पद्य) अपलोड करणे सुरू आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत आपणास काही साहित्य अपूर्ण / अव्यवस्थित दिसेल. त्याकरिता दिलगिरी व्यक्त करत आहोत. हे काम पूर्ण झाल्यानंतर आपणास तशी माहिती देण्यात येईल. जय गुरु ! 🙏 🔥 सुचना क्र. २ : कुठलेही भजन किंवा गद्य - पद्य साहित्य शोधण्यासाठी शक्यतोवर त्यात असलेल्या साध्या शब्दांची निवड करावी, जसे की 'मंगलमय नाम' / 'चरण तयांचे'. जोडशब्द, वेलांटी, उकार असलेले शब्द संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या शब्दाप्रमाणे असावेत अन्यथा आपल्याला हवे असलेले साहित्य दिसणार नाही. धन्यवाद !

अमर तरिच मी नवस्फूर्तीने

(चाल : उठा गड्या ! अरुणोदय झाला...)

अमर तरिच मी नवस्फूर्तीने, करीन पुरुषार्था ।
अपुला-परका भेद न पाहता, सुखविन दीन-जनता धृ.

सकल लोक हे सुखशांतीने नांदो यासाठी ।
जे जे कर्म करावे ते ते, करील याच अटी 

धर्मवर्म मज एकचि कळते, जगणे समुदायी ।
कोणि असो, हव्यास नसावा, धन-माना ठायी 

मी म्हणजे मम देश, राष्ट्र मी, कुटुंब महि सारी ।
तुकड्यादास म्हणे हे केले, तरिच खरी थोरी