अपवित्र वाणी कधी नसावी अपवित्र वाणी ।कधी नसावी वदनी ॥ कधी गुण दोष ।दावू नका या कारणास ॥ आड नेऊ नका पाय ।नाही तरी डोही जाय ॥ तुकड्या म्हणे पहा ।नेत्री देवचि सर्व हा ॥