अंगी नसावी महंती अंगी नसावी महंती । दुःख वाटो नये खंती ॥लोक लाज वगळोनी । सदा रहावे कीर्तनी ॥गावे पंढरीच्या राया ।रंगी रंग लावोनिया ॥तुकड्या म्हणे तैच तरावे । संसारासी उद्धरावे ॥