मन रंगले हरिनामी मन रंगले हरिनामी ।बंद झाल्या विषय उर्मी ॥मुरली अंतर वासना ।धाली हरीच्या चरणा ॥गेला देहाचा अभिमान ।लाज पळाली सोडून ॥तुकड्या म्हणे ऐसे होता ।ब्रह्मज्ञान येई हाता ॥