वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी इथे शब्द सादर करा

अफाट पंढरीची पेठ

अफाट पंढरीची पेठ ।
गमे दुसरा वैकुंठ ॥
 
लक्षावधि वारकरी ।
येती येथीच्या बाजारी ॥
 
नेती सामानाच्या गोण्या ।
चहू दिशासी वाटण्या ॥
 
तुकड्या म्हणे प्रेमभाव ।
हरिनामाची देवघेव ॥