अखंडता त्यासी आली अखंडता त्यासी आली ।वृत्ति हरिनामी रंगली ॥सदा देता घेता नाम ।नामाविण नाही काम ॥आत बाहेर निर्मळ ।हरि कीर्तन सर्वकाळ ॥तुकड्या म्हणे देह जळे ।नामनिष्ठा परि ना ढळे ॥