अगाध नमो गणनाथ ! अगाध अगाध नमो गणनाथ ! ।अवतरोनि पंथ वाढविला ॥ अष्टदासी तुझ्या लोळती चरणी ।नाम घेता हानी अज्ञानाची ॥ अल्पमती माझी, हृदयी बैसोनी ।बुद्धि देई मनी स्वरूपाची ॥ म्हणे तुकड्यादास कृपा करी आता ।सख्या जगत्राता ! गणाधीशा ! ॥