वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी इथे शब्द सादर करा

अघोर काननी व्याघ्रlदीका

अघोर काननी व्याघ्रादिका - स्थानी ।
बर्फाचियाहनि गेलो आम्ही ॥
 
पायीचा प्रवास बहु केला त्रास ।
परि या चित्तास शांति नाही 
 
दरी खोरी किती भुयारा शोधिले ।
सुख ना लाधले क्षण आम्हा 
 
तुकड्यादास म्हणे सुखावलो अंगी ।
जाता पांडुंगी शरण भावे ॥