अचळ अमळ नित्य सर्वकाळ अचळ अमळ नित्य सर्वकाळ ।ज्ञानियाचे मूळ गुरु माझा ॥ ना मरे मरणी न जन्मे जन्मुनी ।न राहे राहुनी गुरु माझा ॥ करोनी अकर्ता पाही न पाहता ।निर्विकल्प सत्ता गुरु माझा ॥ तुकड्यादास म्हणे धन्य त्याची लीला ।आपणचि झाला सर्व काही ॥