अचाट अवघड घाट, कसा थाटाने तरशी रे ?
चुकली वेळा संधीची तर, भटकत फिरशी रे ! ॥धृ.॥
भवसागर हा दुस्तर बापा ! कैसा हरशी रे ?
नको दाखवू गर्व कुणाला, मधीच मरशी रे ! ॥१॥
विसरु नको श्रीगुरुच्या नामा, तो अविनाशी रे !
त्याविण नाही दैवत बापा ! नच जा काशी रे ? ॥२॥
प्रगट करी अंतरिच्या भावा, भज अविनाशी रे !
तुकड्यादास म्हणे त्या भजण्या, धर पद श्वासी रे ! ॥३॥