वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी
🔥 सुचना क्र. १ : या संकेतस्थळावर वं. राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांचे समग्र साहित्य (गद्य - पद्य) अपलोड करणे सुरू आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत आपणास काही साहित्य अपूर्ण / अव्यवस्थित दिसेल. त्याकरिता दिलगिरी व्यक्त करत आहोत. हे काम पूर्ण झाल्यानंतर आपणास तशी माहिती देण्यात येईल. जय गुरु ! 🙏 🔥 सुचना क्र. २ : कुठलेही भजन किंवा गद्य - पद्य साहित्य शोधण्यासाठी शक्यतोवर त्यात असलेल्या साध्या शब्दांची निवड करावी, जसे की 'मंगलमय नाम' / 'चरण तयांचे'. जोडशब्द, वेलांटी, उकार असलेले शब्द संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या शब्दाप्रमाणे असावेत अन्यथा आपल्याला हवे असलेले साहित्य दिसणार नाही. धन्यवाद !

अघटित अशी घडली घटना

(चाल : जीवन में पिया तेरा साथ रहे...)
 
अघटित अशी घडली घटना,
अति लख्ख प्रकाश दिसे नयना ॥धृ. 
 
किती रंग अनंत उफाळित हे,
लहरावत जणुं सुख - सागर तो ।
एकावरी वरवर चक्र दिसे,
जणु प्राण उडे गमला गगना ! ॥१॥ 
 
कुणी मंजुळ वीणा वाजवितो,
या जिवभावाला मोहवितो ।
जणु बांसरिचा प्रति येत ध्वनी,
आदेश करी मग निर्भय ना ! ॥२॥
 
कुणि अमृत पान करा म्हणती,
देउनिया धारची धार जशी ।
ही गोड रुची किति सांग तुम्हा ?
मन उन्मन होत पिता , पल ना ! ॥३
 
षड्चक्र खडाखड जागृत हे,
त्या कुंडलिनीसी घे खटके ।
तुकड्या म्हणे , गुरुनी वरद् दिला,
त्या रात्रिच हा दिसला नयना ! ॥४