तोचि आवडला माझिये चिंतनी तोचि आवडला माझिये चिंतनी ।त्यासी ध्यानी मनीं गावू आम्ही ॥१॥रूप पाहू त्याचे नाम गावू त्याचे ।कर्म करू साचे तयासाठी ॥२॥आवडीचा साठा सापडला हाता ।सोडाया मागुता नेघे जीव ॥३॥तुकड्यादास म्हणे जो का सद्गुरूराव ।अर्पूदेहभाव पायी त्याच्या ॥४॥