अनंत पुण्याते करुनी अनंत पुण्याते करूनी ।येई प्राणी ये चरणी ॥ करी बहू अनुष्ठान ।तया चंद्रभागे स्नान ॥ ज्यासी गुरुकृपा पुरी ।तोचि पाहील पंढरी ॥ तुकड्या म्हणे ऊर्ध्व प्राण ।पाही विठ्ठल - चरण ॥