अनंत जन्माचे सुकृत अनंत जन्माचे सुकृत ।आजी फळले अकस्मात ॥ झाला लाभाचाहि लाभ ।दृष्टी पडला पद्मनाभ ॥ ज्याचे कटावरी कर ।गळा तुळसीचे हार ॥ तुकड्या म्हणे सगुणमूर्ति ।देई जीवासी विश्रांति ॥