वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी इथे शब्द सादर करा

अभ्यासचि सर्व साधी

अभ्यासचि सर्व साधी ।
योग याग प्रणवादि ॥

जप तप अभ्यासेची ।
हठ योगादि सर्वचि ॥

भक्ति हवी अभ्यासिली ।
व्हावी इंद्रिया लागली ॥

तुकड्या म्हणे हे वळण ।
करी जन्माचे तारण ॥