वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी इथे शब्द सादर करा

अभाग्यासी काही घडेल

अभाग्यासि काहीं घडेल की काय ?
चिंतना ही खाय मनामाजी ॥धृ.॥

करावे ते होते उफराटे सदा ।
काय या गोविंदा वाटे नेणो ॥१॥

इच्छा राहे एक घड़तसे एक ।
होते जाते एक सदा काळी ॥२॥

तुकड्यादास म्हणे सुचेना या जिवा ।
काय या केशवा मनी आहे ॥३॥