वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी इथे शब्द सादर करा

अभंग लिहिण्याचा उद्देश

अभंग लिहिण्याचा उद्देश ।
नाही दुजा, देव साक्ष ॥

मन गुंगे त्याचे ध्यानी ।
वेड लागले म्हणूनी ॥

प्रीय वाटे ऐसी भक्ति ।
सर्व अंगे लीन होती ॥

तुकड्या म्हणे तत्व दुजे ।
आम्ही न बोलो सहजे ॥