वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी इथे शब्द सादर करा

अत्रि-अनुसया-सुत

अत्रि-अनुसया-सुत ।
तया माझे दंडवत ॥
 
धन्य धन्य योगीराज । 
ज्याचा तिन्ही लोकी ध्वज ॥
 
द्याया जना उपदेश । 
करी जनार्दन शिष्य ॥
 
तुकड्यादासा कृपा करा ।
हस्त ठेवोनिया शिरा ॥