अठराही पुराणे श्रुतिशास्त्र-मत अठराही पुराणे श्रुतिशास्त्र-मत । जाहले संमत नामासाठी ॥ गोड नाम जपा अंतरी धरोनि । चुकेल धरणी काळाची त्या ॥ नाही आडकाठी जाया मोक्षपुरी । सायुज्यता घरी बसता येई ॥ तुकड्यादास म्हणे नाम जपा कारे । निर्मळ अंतरे करूनिया ॥