वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी इथे शब्द सादर करा

अज्ञान ते दूर झाले

अज्ञान ते दूर झाले ।
ज्ञान भक्तीशी मिळाले ॥

तेणे आला दिव्य रंग ।
प्रगट झाला पांडुरंग ॥

हरले देहाचे मी पण ।
झाले पांडुरंगी लीन ॥

तुकड्या म्हणे सांगावया ।
शब्द न पुरती वाया ॥