वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी इथे शब्द सादर करा

अजुनी साधेना तो योग

अजुनी साधेना तो योग ।
कठिण वाटतसे मार्ग ॥
 
भक्ति न घडे अखंड ।
मार्गी विघ्ने ही उदंड ॥
 
वाटे कोठे जावे रानी ।
व्याधी उपाधी सोडोनी ॥
 
तुकड्या म्हणे शीण आला ।
बघुनी जगाचा गलबला ॥