वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी इथे शब्द सादर करा

अजागळाचिये परी

अजागळाचिये परी ।
ज्ञानी पंडीतांची थोरी ॥
 
जया अंगी नाही प्रेम । 
त्यासी कैचा पावे राम ॥
 
प्रेमभक्तीचा भुकेला । 
देव भाविकांचा झाला 
 
तुकड्या म्हणे ज्ञानभक्ती ।
मिळवूनी रंगवा श्रीपती ॥