(चाल : ना छेडो गाली देऊँगी...)
मज नको नको ही आशा,
व्यर्थ तमाशा कासया ? ॥धृ.॥
जमवूनी द्रव्य-धन- दारा, घरदार - शेति - परिवारा ।
मग लुटती चोर पसारा, हा भव-भारा कासया ? ॥१॥
जे मिळेल तेची खावे, प्रभु-पदी लीन वागावे ।
ही वेळ सुखे निभवावे, मायिक पाराहि कासया ? ॥२॥
जरि दुःख शरीरा झाले, तरि सहन करावे घाले ।
तुकड्याने तन अर्पियले, दुसऱ्या द्यावे कासया ? ॥३॥