वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी
🔥 सुचना क्र. १ : या संकेतस्थळावर वं. राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांचे समग्र साहित्य (गद्य - पद्य) अपलोड करणे सुरू आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत आपणास काही साहित्य अपूर्ण / अव्यवस्थित दिसेल. त्याकरिता दिलगिरी व्यक्त करत आहोत. हे काम पूर्ण झाल्यानंतर आपणास तशी माहिती देण्यात येईल. जय गुरु ! 🙏 🔥 सुचना क्र. २ : कुठलेही भजन किंवा गद्य - पद्य साहित्य शोधण्यासाठी शक्यतोवर त्यात असलेल्या साध्या शब्दांची निवड करावी, जसे की 'मंगलमय नाम' / 'चरण तयांचे'. जोडशब्द, वेलांटी, उकार असलेले शब्द संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या शब्दाप्रमाणे असावेत अन्यथा आपल्याला हवे असलेले साहित्य दिसणार नाही. धन्यवाद !

मज नाहि कुणाची आशा

(चाल : ना छेडो गाली देऊँगी...)

मज नाहि कुणाची आशा,
त्या जगदीशा वाचुनी ॥धृ.॥

भव-सागर - लहरा भारी, मज कोण येउनी तारी ।
तो तुची खरा कैवारी, संकट वारी धावुनी ॥१॥

ध्रुवबाळ पाच वर्षाचे, नामस्मरणी त्या नाचे ।
दिधले स्थळ ते मोक्षाचे, अढळ पदासी नेउनी ॥२॥

प्रल्हाद बाळ वाचविला, खांबामधुनी खळवळला ।
कश्यपू दुष्ट मारियला, तुकड्या सांगे सांगणी ॥३॥