अंगी भस्माचे लेपन अंगी भस्माचे लेपन ।गळा मुंडमाळा जाण ॥सर्प अंगासी खेळती ।नाचे पार्वतीचा पती ॥राही कैलास शिखरी । मूर्तिमंत वास करी ॥तुकड्या म्हणे व्याघ्रांबर ।भूषण मिरवीतो शंकर ॥