वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी इथे शब्द सादर करा

अंगी नाही भक्ति-झरा

अंगी नाही भक्ति-झरा ।
देव कां करी बिचारा ? ॥

आपुलिया कर्मे घेणे । 
हे तो देवाजीचे देणे ॥

केले नाही कांही । 
मुक्ति मागणे फोल ही ॥

तुकड्या म्हणे करा । 
पुढे मागा हरिहरा ॥