वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी
🔥 सुचना क्र. १ : या संकेतस्थळावर वं. राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांचे समग्र साहित्य (गद्य - पद्य) अपलोड करणे सुरू आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत आपणास काही साहित्य अपूर्ण / अव्यवस्थित दिसेल. त्याकरिता दिलगिरी व्यक्त करत आहोत. हे काम पूर्ण झाल्यानंतर आपणास तशी माहिती देण्यात येईल. जय गुरु ! 🙏 🔥 सुचना क्र. २ : कुठलेही भजन किंवा गद्य - पद्य साहित्य शोधण्यासाठी शक्यतोवर त्यात असलेल्या साध्या शब्दांची निवड करावी, जसे की 'मंगलमय नाम' / 'चरण तयांचे'. जोडशब्द, वेलांटी, उकार असलेले शब्द संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या शब्दाप्रमाणे असावेत अन्यथा आपल्याला हवे असलेले साहित्य दिसणार नाही. धन्यवाद !

अज्ञानी पामर काय जाणे

गुरुप्राप्तीची याचना

अज्ञानी पामर काय जाणे देवा !
तुझी चरण-सेवा देई मज ॥

ऋषीमुनी ब्रह्म यासी नाही थाक ।
अज्ञानाची हाक काय घेती ? ॥

चोदा विद्या, शास्त्रे, अठराही पुराणे ।
परी गुरुविणे वर्म नाही ॥

म्हणे तुकड्यादास वसिष्ठासारिखे ।
गुरु व्यक्त राखे रघुनाथ ॥