वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी इथे शब्द सादर करा

अखंड चालविली वारी

अखंड चालविली वारी ।
वैष्णवांचे सहाकारी ॥

ज्ञानेश्वर भक्तराज । 
राजाधिराज महाराज ॥

त्याची कोण जाणे कळा ? । 
तो हा चैतन्य-पुतळा ॥

तुकड्या म्हणे शरण आलो । 
संतापायी लीन झालो ॥