वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी इथे शब्द सादर करा

अखंड वृत्ति ब्रह्माकार

अखंड वृत्ति ब्रह्माकार ।
तया नाही जग व्यापार ॥

कर्म प्रारब्धा आधीन ।
करवी तोचि नारायण ॥

काय असेल ते घ्यावे ।
सदा संतुष्ट रहावे ॥

तुकड्या म्हणे ज्ञानाग्नीने ।
तुटती जीवाची बंधने ॥