वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी
🔥 सुचना क्र. १ : या संकेतस्थळावर वं. राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांचे समग्र साहित्य (गद्य - पद्य) अपलोड करणे सुरू आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत आपणास काही साहित्य अपूर्ण / अव्यवस्थित दिसेल. त्याकरिता दिलगिरी व्यक्त करत आहोत. हे काम पूर्ण झाल्यानंतर आपणास तशी माहिती देण्यात येईल. जय गुरु ! 🙏 🔥 सुचना क्र. २ : कुठलेही भजन किंवा गद्य - पद्य साहित्य शोधण्यासाठी शक्यतोवर त्यात असलेल्या साध्या शब्दांची निवड करावी, जसे की 'मंगलमय नाम' / 'चरण तयांचे'. जोडशब्द, वेलांटी, उकार असलेले शब्द संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या शब्दाप्रमाणे असावेत अन्यथा आपल्याला हवे असलेले साहित्य दिसणार नाही. धन्यवाद !

भज गणराज दयाल, प्राण्या !

(चाल : तू माझा यजमान रामा...)

भज गणराज दयाल, प्राण्या ! धृ.॥

सेंदुर- भूषण, उंदीर वाहन,
हिमनगजेचा बाल ॥ प्राण्या... ॥१॥

सरस्वती - वर, शंकर-तनया,
गळी मुक्तांची माळ  प्राण्या... ॥२॥ 

मंगलमूर्ती विघ्नविनाशक,
स्मरता तुटतील जाल  प्राण्या... ॥३॥ 

तुकड्यादास तयाला ध्यायी,
तोचि करी प्रतिपाल ॥ प्राण्या... ॥४॥