वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी
🔥 महत्वाची सूचना : या संकेतस्थळावर वं. राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांचे साहित्य (गद्य - पद्य) अपलोड करणे सुरू आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत आपणास काही साहित्य अपूर्ण / अव्यवस्थित दिसेल. त्याकरिता दिलगिरी व्यक्त करत आहोत. हे काम पूर्ण झाल्यानंतर आपणास तशी माहिती देण्यात येईल. जय गुरु ! 🙏

अनंत जन्माचा शेवट

अनंत जन्माचा शेवट ।
नरदेह हा अवचट ॥
 
निघे अमृताचा झरा ।
सोह नामी येरझारा 
 
इडा -पिंगला ती नदी ।
संगम होतो त्रिकुटामधी ॥
 
राही अजपामध्ये लीन ।
तुकड्या म्हणे होशिल धन्य ॥