वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी
🔥 सुचना क्र. १ : या संकेतस्थळावर वं. राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांचे समग्र साहित्य (गद्य - पद्य) अपलोड करणे सुरू आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत आपणास काही साहित्य अपूर्ण / अव्यवस्थित दिसेल. त्याकरिता दिलगिरी व्यक्त करत आहोत. हे काम पूर्ण झाल्यानंतर आपणास तशी माहिती देण्यात येईल. जय गुरु ! 🙏 🔥 सुचना क्र. २ : कुठलेही भजन किंवा गद्य - पद्य साहित्य शोधण्यासाठी शक्यतोवर त्यात असलेल्या साध्या शब्दांची निवड करावी, जसे की 'मंगलमय नाम' / 'चरण तयांचे'. जोडशब्द, वेलांटी, उकार असलेले शब्द संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या शब्दाप्रमाणे असावेत अन्यथा आपल्याला हवे असलेले साहित्य दिसणार नाही. धन्यवाद !

मंगलमय नाम तुझे

(चाल : हरिभजनावीण काळ घालवु...)

मंगलमय नाम तुझे, सतत गाऊ दे ॥धृ.॥

दुर्बल या हृदयातुनि, चंचल या चित्तातुनि ।
झुरझुरत्या नेत्रातुनि, स्वरुप पाहु दे ॥ मंगल... ॥१॥

अंधाऱ्या, निर्जन वनि, विषयांच्या काट्यांतुनि ।
चौऱ्यांशी गोट्यातुनि, पार जाउ दे ॥ मंगल... ॥२॥


संतांची बोध-धुळी, लागो या देह-कुळी ।
भक्तीच्या प्रेम-जळी, मस्त होउ दे ॥ मंगल... ॥३॥

मन्मानस - मंदिरात, सिंहासन तव प्रशांत ।
'सोहं' ध्वनि गात गात, रंगि रंगु दे ॥ मंगल... ॥४॥

भवसागर कठिण घोर, षड्रिपु हे करिति जोर ।
तुकड्याची नाव पार, स्थीर होउ दे ॥ मंगल... ॥५॥