वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी
🔥 महत्वाची सूचना : या संकेतस्थळावर वं. राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांचे साहित्य (गद्य - पद्य) अपलोड करणे सुरू आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत आपणास काही साहित्य अपूर्ण / अव्यवस्थित दिसेल. त्याकरिता दिलगिरी व्यक्त करत आहोत. हे काम पूर्ण झाल्यानंतर आपणास तशी माहिती देण्यात येईल. जय गुरु ! 🙏

संत-अवतार होती याचसाठी

संत-अवतार होती याचसाठी ।
अंधारी दिवटी दावावया ॥धृ.॥

भूलले हे जन मायेच्या झांपडी ।
तयांतुनी काढी संत बोधे ॥१॥

दाखविती मार्ग आत्म-स्वरूपाचा ।
भेद जिवशिवाचा मिटावया ॥२

तुकङ्यादास म्हणे तयांचा स्वभाव ।
दुजियासी ठाव दावो लागे ॥३॥