वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी
🔥 महत्वाची सूचना : या संकेतस्थळावर वं. राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांचे साहित्य (गद्य - पद्य) अपलोड करणे सुरू आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत आपणास काही साहित्य अपूर्ण / अव्यवस्थित दिसेल. त्याकरिता दिलगिरी व्यक्त करत आहोत. हे काम पूर्ण झाल्यानंतर आपणास तशी माहिती देण्यात येईल. जय गुरु ! 🙏

अनेकांची मते अनेक निघती

अनेकांची मते अनेक निघती ।
आपणची गाती किर्ती मोठी ॥
 
म्हणे माझा पंथ ऐसा मोठा आहे ।
या हो ! लवलाहे पंथी माझ्या ॥
 
होती वादावाद निशिदिनी सदा ।
कोणी त्या गोविंदा न मानेचि ॥
 
म्हणे तुकड्यादास परोक्ष हे ज्ञान ।
घेऊनी तरण होई काय ? ॥