वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी
🔥 महत्वाची सूचना : या संकेतस्थळावर वं. राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांचे साहित्य (गद्य - पद्य) अपलोड करणे सुरू आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत आपणास काही साहित्य अपूर्ण / अव्यवस्थित दिसेल. त्याकरिता दिलगिरी व्यक्त करत आहोत. हे काम पूर्ण झाल्यानंतर आपणास तशी माहिती देण्यात येईल. जय गुरु ! 🙏

ग्रंथारम्भ - स्तवन

० ग्रंथारम्भ – स्तवन ०
(भुजंग-प्रयात)

नमो सदगुरु ! ज्ञानदीप प्रकाशा !
नमो आद्यरुपा अनंता परेशा !

नमो मंगलामंगल द्वैत-हारी !
नमो त्वत्कृपा पूर्ण दोषा निवारी !

तुझे रूप ते पाहु दे विश्वव्यापी !
तुझी पाउले सेवु दे ग्रामरूपी !

तुझे ज्ञान सर्वांतरी संचरु दे !
तुझा सत्य आनंद लोकी भरु दे !

खरे नाम निष्काम ही ग्रामसेवा !
झटू सर्वभावे करू स्वर्ग गावा !

कळो हे, वळो देह कार्यों पडू दे !
घडू दे प्रभो ! एवढे हे घडू दे !