वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी
🔥 सुचना क्र. १ : या संकेतस्थळावर वं. राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांचे समग्र साहित्य (गद्य - पद्य) अपलोड करणे सुरू आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत आपणास काही साहित्य अपूर्ण / अव्यवस्थित दिसेल. त्याकरिता दिलगिरी व्यक्त करत आहोत. हे काम पूर्ण झाल्यानंतर आपणास तशी माहिती देण्यात येईल. जय गुरु ! 🙏 🔥 सुचना क्र. २ : कुठलेही भजन किंवा गद्य - पद्य साहित्य शोधण्यासाठी शक्यतोवर त्यात असलेल्या साध्या शब्दांची निवड करावी, जसे की 'मंगलमय नाम' / 'चरण तयांचे'. जोडशब्द, वेलांटी, उकार असलेले शब्द संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या शब्दाप्रमाणे असावेत अन्यथा आपल्याला हवे असलेले साहित्य दिसणार नाही. धन्यवाद !

गुरूचे चिंतन नित्य चिरंतन

गुरूचे चिंतन नित्य चिरंतन ।
त्यांतचि तन्मय मन हे उन्मन ॥धृ.॥

धगधगते ज्वाला त्यागाची ।
उज्वल-ज्योती निज ज्ञानाची ॥
हाती कमळें जनसेवेची ।
नित्य शिकविते विचार - मंथन ॥१॥

शांति ध्वज लहरे महाद्वारी ।
उत्साहाची वाजत भेरी ॥
गगन गर्जना मानव तारी ।
सत्य-अहिंसा निर्भय भूषण ॥२॥

दरी-कंदरी वसती सुंदर ।
कीर्ती जयाची हिमालयावर ॥
तुकड्यादासा अविरत गहिवर ।
स्वानंदाचे मस्तकि चंदन ॥३॥