वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी
🔥 सुचना क्र. १ : या संकेतस्थळावर वं. राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांचे समग्र साहित्य (गद्य - पद्य) अपलोड करणे सुरू आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत आपणास काही साहित्य अपूर्ण / अव्यवस्थित दिसेल. त्याकरिता दिलगिरी व्यक्त करत आहोत. हे काम पूर्ण झाल्यानंतर आपणास तशी माहिती देण्यात येईल. जय गुरु ! 🙏 🔥 सुचना क्र. २ : कुठलेही भजन किंवा गद्य - पद्य साहित्य शोधण्यासाठी शक्यतोवर त्यात असलेल्या साध्या शब्दांची निवड करावी, जसे की 'मंगलमय नाम' / 'चरण तयांचे'. जोडशब्द, वेलांटी, उकार असलेले शब्द संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या शब्दाप्रमाणे असावेत अन्यथा आपल्याला हवे असलेले साहित्य दिसणार नाही. धन्यवाद !

दावी स्वरूप आता

(चाल : राजास जी महाली...)

दावी स्वरूप आता, का वेळ रामराया !
अनिवार सर्व ओढी ही काम - क्रोध - माया ॥धृ.॥

तारोनि ध्रुवबाळा, तोडोनि मायाजाळा ।
बसवी स्थळास अढळा, का केलि सांग छाया ? ॥१॥

प्रल्हाद बाळ साचा, सुत होय कश्यपूचा।
का करिसि मान त्याचा ? तो दैत्य मारवाया ॥२॥

भक्तात श्रेष्ठ झाला वाणी तुका निवाला।
वाल्मिक तारियेला, गुण - कीर्ति वाढवाया ॥३॥

अगणीत भक्त तूझे, हरि ! धाव, येई काजे ।
उचली प्रपंच - ओझे, तुकड्यास ठाव द्याया ॥४॥