वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी
🔥 सुचना क्र. १ : या संकेतस्थळावर वं. राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांचे समग्र साहित्य (गद्य - पद्य) अपलोड करणे सुरू आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत आपणास काही साहित्य अपूर्ण / अव्यवस्थित दिसेल. त्याकरिता दिलगिरी व्यक्त करत आहोत. हे काम पूर्ण झाल्यानंतर आपणास तशी माहिती देण्यात येईल. जय गुरु ! 🙏 🔥 सुचना क्र. २ : कुठलेही भजन किंवा गद्य - पद्य साहित्य शोधण्यासाठी शक्यतोवर त्यात असलेल्या साध्या शब्दांची निवड करावी, जसे की 'मंगलमय नाम' / 'चरण तयांचे'. जोडशब्द, वेलांटी, उकार असलेले शब्द संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या शब्दाप्रमाणे असावेत अन्यथा आपल्याला हवे असलेले साहित्य दिसणार नाही. धन्यवाद !

अंगि नाही ज्ञान, म्हणे साधु

(चाल : देव बाजारचा भाजिपाला...)

अंगि नाही ज्ञान,म्हणे साधु मला मान ।
साधु नावानं साधु होत नाहि हो  
साधु हॉटेलचा चहा-पाणि नाही हो ! धृ.

जंगलच्या अस्वलिला मोठ्या-मोठ्या जटा ।
पारधी लंगोटीनं त्यागि दिसे मोठा 
कुत्र्याच्या अंगावर भगव्याची छटा ।
गाढवाच्या अंगी नाहि भस्माचा तोटा 
साधु हॉटेलचा चहा-पाणि नाहि हो ! 

साधूचं साधुत्व नाही पंथात ।
साधूचं साधुत्व नाही तीर्थात 
साधूचं साधुत्व नाही वर्णात ।
जाती-पातित नाही साधूची मात 
साधु हॉटेलचा चहा-पाणि नाही हो ! ॥२

सत्याचरणाविण साधुत्व नाही ।
आत्म - ज्ञानाविण साधुत्व नाही 
प्रभू - भजनाविण साधुत्व नाही ।
तुकड्यादास म्हणे, ऐका हि ग्वाही 
साधु हॉटेलचा चहा-पाणि नाही हो ! ॥३