वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी
🔥 सुचना क्र. १ : या संकेतस्थळावर वं. राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांचे समग्र साहित्य (गद्य - पद्य) अपलोड करणे सुरू आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत आपणास काही साहित्य अपूर्ण / अव्यवस्थित दिसेल. त्याकरिता दिलगिरी व्यक्त करत आहोत. हे काम पूर्ण झाल्यानंतर आपणास तशी माहिती देण्यात येईल. जय गुरु ! 🙏 🔥 सुचना क्र. २ : कुठलेही भजन किंवा गद्य - पद्य साहित्य शोधण्यासाठी शक्यतोवर त्यात असलेल्या साध्या शब्दांची निवड करावी, जसे की 'मंगलमय नाम' / 'चरण तयांचे'. जोडशब्द, वेलांटी, उकार असलेले शब्द संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या शब्दाप्रमाणे असावेत अन्यथा आपल्याला हवे असलेले साहित्य दिसणार नाही. धन्यवाद !

भूमिदानाला देवोनि चालना

(चाल : भूमिदानाचं वेड कसं लागल !...)

भूमिदानाला देवोनि चालना,
करु खेड्याची मिळोनी रचना ॥धृ.॥

ब्राह्मण-कुणबी कुठला, महार-चांभार कुठला,
मानवधर्म अपुला ।
एक होवोनि पाळू या वचना ॥१॥

सारे कष्ट करु, हाती टिकास धरु,
वाचे देवा स्मरु ।
राव-रंकांचा भेद नाही ठेवुना ॥२॥

आपण लोहार-सुतार, शिंपी-कुंभार-बेलदार,
भंगी -वैद्य-वडार ।
अमुच्या गावात भिकारि राहिना ॥३॥

मिटवू झगडा गावात, नाहि सरकारी बात,
आमुचा न्याय आमच्यात ।
कोणि दुर्गृण राही-मजाल ना ! ॥४॥

आम्हि रस्ते सुधरु, विहिरि-संडास करू,
रात्री जागली फिरू ।
करु गावात समुदाय प्रार्थना ॥५॥

युवका देऊ व्यायाम, सर्वा शिकवू हे काम,
वाढवू गावाचे नाम ।
तुकड्या म्हणे होऊनि खुशालना ॥६॥