वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी
🔥 सुचना क्र. १ : या संकेतस्थळावर वं. राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांचे समग्र साहित्य (गद्य - पद्य) अपलोड करणे सुरू आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत आपणास काही साहित्य अपूर्ण / अव्यवस्थित दिसेल. त्याकरिता दिलगिरी व्यक्त करत आहोत. हे काम पूर्ण झाल्यानंतर आपणास तशी माहिती देण्यात येईल. जय गुरु ! 🙏 🔥 सुचना क्र. २ : कुठलेही भजन किंवा गद्य - पद्य साहित्य शोधण्यासाठी शक्यतोवर त्यात असलेल्या साध्या शब्दांची निवड करावी, जसे की 'मंगलमय नाम' / 'चरण तयांचे'. जोडशब्द, वेलांटी, उकार असलेले शब्द संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या शब्दाप्रमाणे असावेत अन्यथा आपल्याला हवे असलेले साहित्य दिसणार नाही. धन्यवाद !

अंतरलो तव पाय हरी रे !

(चाल : धन्य सद्गुरु ! वैभव तुमचे...)

अंतरलो तव पाय हरी रे ! मी गर्भापासुनी ।
असा का निष्ठुर होसी मनी ? धृ.

अज्ञ जरी का बाळ, असे तरि दयाळ तू श्रीहरी !
करी गा ! कृपा दीनाचे वरी ॥१

करुनिया उपदेश मंत्र मज दिधला गर्भातरी ।
अता का विसरलास अंतरी ! ॥२

अपराधी मी पामर तुमचा अज्ञानी बांधलो ।
कृपेने आज चरण लाधलो ॥३

तुकड्यादास उदास असे हा दीनदयाळा ! जनी ।
म्हणुनिया भक्त पाळि धावुनी ॥४