वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी
🔥 सुचना क्र. १ : या संकेतस्थळावर वं. राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांचे समग्र साहित्य (गद्य - पद्य) अपलोड करणे सुरू आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत आपणास काही साहित्य अपूर्ण / अव्यवस्थित दिसेल. त्याकरिता दिलगिरी व्यक्त करत आहोत. हे काम पूर्ण झाल्यानंतर आपणास तशी माहिती देण्यात येईल. जय गुरु ! 🙏 🔥 सुचना क्र. २ : कुठलेही भजन किंवा गद्य - पद्य साहित्य शोधण्यासाठी शक्यतोवर त्यात असलेल्या साध्या शब्दांची निवड करावी, जसे की 'मंगलमय नाम' / 'चरण तयांचे'. जोडशब्द, वेलांटी, उकार असलेले शब्द संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या शब्दाप्रमाणे असावेत अन्यथा आपल्याला हवे असलेले साहित्य दिसणार नाही. धन्यवाद !

अंतरी इच्छा अशी वाहते

(चाल : क्यों नहीं देते हो दर्शन...)

अंतरी इच्छा अशी, वाहते सदा रे माधवा ।
कोण पुरवी आस ही, तुज वाचुनीया केशवा ? धृ.

सृष्टि ही नांदो सुखे, झणि सौख्य इहपर भोगण्या ।
द्रोह ना वाढो कधी, जीवा - जिवाशी राघवा ! ॥१

निंदका सद्बुध्दि हो, हो पापिया सुमती सदा ।
ऐक्य हो राजा-प्रजा, साधू जसे जीवा - शिवा ॥२॥

सृष्टिसौंदर्य रमो, नांदो सदा कांती वनी ।
वीरपुत्रा तेज हो, लढण्या रणी भासो नवा ॥३॥

नष्ट हो ही दैन्यता, बलहीनता, दुर्भाग्यता ।
निर्जीवता, परकी सत्ता, झळको स्वातंत्र्याचा दिवा ॥४॥

काय करणे याजसाठी ? बुद्धि दे दीन पामरा ।
दास तुकड्या मागतो, दे भीक जीवीच्या जिवा ! ॥५॥