वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी
🔥 सुचना क्र. १ : या संकेतस्थळावर वं. राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांचे समग्र साहित्य (गद्य - पद्य) अपलोड करणे सुरू आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत आपणास काही साहित्य अपूर्ण / अव्यवस्थित दिसेल. त्याकरिता दिलगिरी व्यक्त करत आहोत. हे काम पूर्ण झाल्यानंतर आपणास तशी माहिती देण्यात येईल. जय गुरु ! 🙏 🔥 सुचना क्र. २ : कुठलेही भजन किंवा गद्य - पद्य साहित्य शोधण्यासाठी शक्यतोवर त्यात असलेल्या साध्या शब्दांची निवड करावी, जसे की 'मंगलमय नाम' / 'चरण तयांचे'. जोडशब्द, वेलांटी, उकार असलेले शब्द संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या शब्दाप्रमाणे असावेत अन्यथा आपल्याला हवे असलेले साहित्य दिसणार नाही. धन्यवाद !

अंधारी जाऊ नका कोणी

(चाल : परधानि गेला दर्या पार...)

अंधारी जाऊ नका कोणी ॥धृ.॥

भरली गंगा खळखळ वाहे ।
त्यामधी जीव क्रुर आति आहे ॥
ओढूनी नेई पाणि  अंधारी जाऊ... ॥१॥

अंधाऱ्या ह्या रात्री कशाला ।
घेऊनि आशा मार्गि निघाला ? ॥
राहति चोर टपोनी ॥ अंधारी जाऊ... ॥२॥

वनि गर्जत वटवाघुळ फिरती ।
व्याघ्र भयंकर गुरगुर करती ॥
हरतिल प्राण तुटोनी ॥ अंधारी जाऊ... ॥३॥

अति सळसळती साप विषारे ।
काम-क्रोध-मद नांव तया रे ॥
नेतिल शांति लुटोनी  अंधारी जाऊ... ॥४॥

तुकड्यादास म्हणे घ्या हाती ।
ज्ञानप्रकाश चढा मग वरती ॥
करा भजन मनि ध्यानि  अंधारी जाऊ... ॥५॥