वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी इथे शब्द सादर करा

अंगणी रंगणी लोचनी रसनी

अंगणी रंगणी लोचनी रसनी । 
दिसे जनी वनी एक आत्मा 

नाही भेदभाव उंच नीच काही । 
मी तू पण नाही संदेहासी ॥

सुखदुःख भोग त्याग एकरूप । 
निमाला संकल्प ठायी ठायी ॥

तुकड्यादास म्हणे तेचि सिद्ध खरे । 
जैसे लवण विरे अब्धिमाजी ॥