वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी इथे शब्द सादर करा

मिळे अधिकारेचि फळ

मिळे अधिकारेचि फळ ।
ऐसा न्याय हा सकळ ॥

फुके नोहे ब्रह्मज्ञान । 
कोणी आणिल्या मागोन ॥

त्यासी लागे जीव द्यावा । 
तेव्हा मिळे ब्रह्म ठेवा ॥

तुकड्या म्हणे घ्यारे नाम । 
सकळ सिद्धि जाय काम ॥