अठराही पुराणे श्रुतिशास्त्र-मत अठराही पुराणे श्रुतिशास्त्र-मत ।जाहले संमत नामासाठी ॥धृ.॥गोड नाम जपा अंतरी धरोनि ।चुकेल धरणी काळाची त्या ॥१॥नाही आडकाठी जाया मोक्षपुरी ।सायुज्यता घरी बसता येई ॥२॥तुकड्यादास म्हणे नाम जपा कारे ।निर्मळ अंतरे करूनिया ॥३॥