वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी
🔥 सुचना क्र. १ : या संकेतस्थळावर वं. राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांचे समग्र साहित्य (गद्य - पद्य) अपलोड करणे सुरू आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत आपणास काही साहित्य अपूर्ण / अव्यवस्थित दिसेल. त्याकरिता दिलगिरी व्यक्त करत आहोत. हे काम पूर्ण झाल्यानंतर आपणास तशी माहिती देण्यात येईल. जय गुरु ! 🙏 🔥 सुचना क्र. २ : कुठलेही भजन किंवा गद्य - पद्य साहित्य शोधण्यासाठी शक्यतोवर त्यात असलेल्या साध्या शब्दांची निवड करावी, जसे की 'मंगलमय नाम' / 'चरण तयांचे'. जोडशब्द, वेलांटी, उकार असलेले शब्द संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या शब्दाप्रमाणे असावेत अन्यथा आपल्याला हवे असलेले साहित्य दिसणार नाही. धन्यवाद !

अमरसुख सांगा का न कळे ?

(चाल : सुदामजी को देखत श्याम...)

अमरसुख सांगा का न कळे ? ॥धृ.॥

काय करावे कुणा स्मरावे ?
कोण्या मार्गाने हरि ! जावे ?
जेणे मन आकळे ॥ अमरसुख... ॥१॥

सगुण रुपाचे ध्यान कराया ।
सांगा काय करु गुरुराया !
भजन कशाने फळे ? ॥ अमरसुख... ॥२॥

किति एकांत करावा कोठे ?
जीव जगे ना आता वाटे ।
नेत्र प्रभूविण जळे ॥ अमरसुख... ॥३॥

तुकड्यादास म्हणे सांगाना ।
संतमहंतांनो ? या या ना ।
द्या हरि धरुनी बळे ॥ अमरसुख... ॥४॥