वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी इथे शब्द सादर करा

कुणाचिया जोरे वाढलास जगी

कुणाचिया जोरे वाढलास जगी ।
आपुलीच पुंगी वाजवीसी ॥धृ.॥

कोणी दिले तुज गर्भवासी दूध ।
मळ मुत्र गंध सारोनिया ॥१॥

कोणी वाढविले आयुष्य सकळ ।
काळाचेहि काळ दूर केले ॥२॥

तुकड्यादास म्हणे स्मर त्या हरिसी
जेणे अहर्निशी सांभाळीले ॥३॥